पाथर्डी : पोलीस ठाण्यातील ‘डिझेल’ चोरताना पोलिसालाच रंगेहात पकडले

692

अहमदनगर/पाथर्डी (जि. अहमदनगर):  पोलीस ठाण्यातील जप्त मुद्देमालातील बायोडीझेल चोरी करताना एका पोलीस कर्मचाऱ्यासह चौघा विरुद्ध कट करून बायोडीजल चोरीचा तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्याच्या आवारात बनावट डिझेल चोरीचे दोन टँकर उभे आहेत. त्यातूनच, ही चोरी करण्यात आल्याने पोलीस स्टेशनमध्ये खळबळ उडाली आहे.

फिर्यादी पोलीस नाईक ईश्वर गर्जे हे शुक्रवारी रात्री ठाणे अंमलदार कर्तव्यावर हजर असताना इसम नामे यातील आरोपी भागवत काशिनाथ चेमटे राहणार शिंगोरी, असिफ रफिक शेख राहणार पाथर्डी, दीपक आरोळे, विष्णू बाबासाहेब ढाकणे (राहणार टाकळीमानुर,पोलीस नाईक दीपक अशोक शेंडे नेमणूक पाथर्डी पोलीस स्टेशन) यांनी कट रचून संगनमताने दाखल गुन्ह्यातील जप्त टँकरमधील ३ लाख रुपये किमतीचे ५०० लिटर मिनरल बायोडडिझेल इंधन इंजिन व पाइपच्या साह्याने पांढऱ्या रंगाचा टँकर क्रमांक ए(म एच १४ ए एच ६४६८) मध्ये चोरी करून आरोपी विष्णू ढाकणे याच्या पेट्रोल पंपावर बेकायदेशीररित्या विकण्याच्या उद्देशाने चोरी करत असताना मिळून आले.  

चोरीचा विक्रीच्या कटामध्ये पोना दीपक शेंडे (नेमणूक पाथर्डी पोलीस स्टेशन) यांनी त्यांना मदत केली आहे. तेव्हा फिर्यादी व साक्षीदार अशांनी त्यांना चोरी करताना पाहून आरोपी भागवत चेमटे यास पकडले असता आरोपी आसिफ शेख व दीपक आरोळे यांनी फिर्यादी व साक्षीदार किरण बडे अशांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here