अहमदनगर – जातपडताळणी कार्यालयात खोटे जातीचे दाखले काढुन जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणे करिता अर्ज केला असल्याने त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात येऊ तसेच दाव्याचा निकाल तक्रारदार यांचे बाजुने लाऊन देण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या दोन आरोपींना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
तक्ररदार यांनी अहमदनगर येथील जातपडताळणी कार्यालयात, तिन इसमांनी खोटे जातीचे दाखले काढुन जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणे करिता अर्ज केला असल्याने त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या करिता दावा दाखल केला होता.
सदर दाव्याचा निकाल तक्रारदार यांचे बाजुने लाऊन देणे करिता आरोपी हबीब बाबुभाई सय्यद याने तक्रारदार यांचें कडे तेथील अधिकारी यांना 1 लाख रुपये द्यावे लागतील असे सांगून एक लाख रुपयांची मागणी केली.
त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली, त्याआधारे दिनांक 13 ऑक्टोबर 2021 रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपी हबीब सय्यद याने पंचा समक्ष 1 लाख रुपयांची मागणी करूनतडजोड अंती 80 हजारांची मागणी करून त्यापैकी अर्धी रक्कम दिनांक 15 ऑक्टोबर 2021 रोजी स्विकारण्याचे मान्य केले. ती रक्कम स्विकारुन शकिल अब्बास पठाण याचे कडे दिली असता दोन्ही आरोपी यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्व नागरीकांना आवाहन केला आहे की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.