? कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना एकापेक्षा जास्त करंट अकाउंट म्हणजे चालू खाती उघडता येणार नाहीत असे सर्क्युलर रिझर्व्ह बॅंकेने गेल्या महिन्यात काढले आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयावर उद्योग महासंघाने असमाधान व्यक्त केले असून या निर्णयावर फेरविचार करावा अशी विनंती केली आहे.
? रिझर्व्ह बॅंकेचा उद्देश चांगला आहे. मात्र बॅंका, बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था, गृहवित्त कंपन्यांकडे असलेल्या सध्याच्या खात्याच्या कामकाजावर परिणाम होईल. यामुळे काम वाढेल, अकार्यक्षमता वाढेल, दिरंगाई वाढेल, सेवाचा खर्च वाढेल.
? कोणत्या ग्राहकांकडे किती रक्कम जाते, याची शहानिशा करण्यासाठी एखादी दुसरी यंत्रणा विकसित करण्याची गरज आहे.
? मोठ्या रकमेच्या व्यवहाराकडे लक्ष दिले तरी रिझर्व्ह बॅंकेचा उद्देश सफल होऊ शकतो. मात्र सरसकट एकापेक्षा जास्त करंट अकाउंट काढण्यावर बंधन घालने बरोबर होणार नाही. उद्योग महासंघाने रिझर्व्ह बॅंक सध्याच्या परिस्थितीत सक्रिय भूमिका निभावत असल्याबद्दल असमाधान व्यक्त केले आहे. मात्र लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम कमी करण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने आणखी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.