मुंबई – लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याने जानेवारीत महिन्यात उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. मात्र उपचाादरम्यान ७ फेब्रुवारी रोजी वयाचे ९२व्या वर्षी त्यांचें निधन झाले.
त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच अनेक कलाकरांनी सोशल मीडियावर लतादीदींना श्रद्धांजली वाहिली. या कलाकारांमध्ये बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा देखील समावेश होतो मात्र अनेक सोशल मीडिया युजर्स तिला ट्रोल करत आहे.
ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लता मंगेशकर यांचा फोटो शेअर करत पोस्ट शेअर केली होती. तिने माझ्याकडे भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. तुमच्या आत्म्याला शांती मिळो या आशयाचे कॅप्शन दिले होते. पण ऐश्वर्याने उशिरा पोस्ट केल्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
नेटकऱ्यांनी कमेंट करत ‘आता आठवण झाली का?’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘इतक्या उशिरा का पोस्ट केली आहेस’ असे म्हटले आहे. अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी ऐश्वर्याला ट्रोल केले आहे.
लता मंगेशकर यांना कोरोनाची सौम्य लक्षण जाणवत होती. त्यामुळे त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली. ७ फेब्रुवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.