अल्पवयीन मुलीचा विवाह पोलीस पाटील व ग्रामसेवकांनी रोखला

407

नेवासा- नेवासा तालुक्यातील रामडोह येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्याचा प्रयत्न पोलीस पाटील ग्रामसेवकांना व पोलिसांच्या मदतीमुळे रोखण्यात यश आले.

याबाबत ग्रामसेवक संतोष कचरु साबळे रा. मुरमे ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, सोमनाथ सीताराम परसैय्या, संगीता सोमनाथ परसैय्या (दोघे रा. रामडोह ता. नेवासा यांनी त्यांची मुलगी अल्पवयीन असताना तिचे लग्न नियोजित नवरा महेश सोमनाथ कुंढारे याचेशी लावून देण्याची तयारी केली होती. तेव्हा पोलीस पाटील यांच्या मदतीने हा विवाह रोखला.

या फिर्यादीवरून मुलीचे आई वडील, नियोजित नवरा तसेच नियोजित नवऱ्याचे वडील उत्तम भागाजी कुंढारे, नियोजित नवऱ्याची आई रुक्मिणी उत्तम कुंढारे सर्वे रा. रामडोह, ता. नेवासा या सर्वांवर मुलगी अल्पवयीन आहे.

हे माहीत असतानाही तिच्याशी विवाह करण्याची तयारी दर्शवून विवाहाची तयारी करून विवाहास चालना दिल्याने बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक फौजदार शैलेंद्र ससाणे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here