अहमदनगर – विनापरवाना वाळूचा ट्रक वाळूसह एका आरोपीला बेलवंडी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत 5 लाख 18 हजार किमतीचा मुद्देमाल देखील बेलवंडी पोलीसांनी जप्त केला असून संतोष मारुती रासकर या आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विनापरवाना वाळू चोरून वाहतूक होत असल्याची माहिती बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी पोलीस पथकाला महिती देत पथक तयार केले.
या पथकामध्ये असणाऱ्या पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक कासार, पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पठारे ,पोलीस कॉन्स्टेबल विकास सोनवणे हे बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नाईट पेट्रोलिंग करत असताना हंगेवाडी शिवारात रोडणे एक हिरव्या रंगाचा ट्रक येताना दिसला.
हा ट्रक थांबवून पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी त्यावरिल चालकास त्याचे नाव गाव विचारले असता संतोष मारुती रासकर असे सांगितले व ट्रक मालक सुहास लक्ष्मण शिंदे (रा.ता. शिरुर जि पुणे) असे असलेचे सांगितले. त्यास ट्रक मध्ये काय आहे असे विचारले असता
आमच्याकडे कोणताही परवाना नाही आम्ही वाळू चोरून विकत आहोत असे त्याने म्हंटले. वाळू कोठे भरली व कोठे घेवून चालला असे विचारले असता त्याने सांगितले की सदर वाळु , दौंड भिमा नदीपात्रातुन भरली ती दौड़ काष्टी हंगेवाडी , चिंभळा , माठ , राजापुर मार्गे शिरुर येथे विना परवाना बेकायदा वाळू भरुन चाललो आहे असे सांगितले.
पोलीसांनी हा ट्रक ताब्यात घेत 5 लाख 18 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पठारे हे करत आहेत.











