संकट मोचन हनुमान मंदिरची दानपेटी फोडुन रोख रक्कम लंपास करणारा आरोपी तोफखाना पोलीसांकडुन जेरबंद

371

अहमदनगर – तोफखाना पोलिसांनी करवाई करुन संकट मोचन हनुमान मंदिरची दानपेटी फोडुन रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.महेश ज्ञानदेव शिंदे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तागड वस्ती येथील संकटमोचक हनुमान मंदिरातील अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून रोख रक्कम चोरून नेल्याची फिर्याद तोफखाना पोलीस भा.द.वि. कलम 461 , 379 प्रमाणे दाखल झालेली होती.

या गून्हाचा तापस करत असताना या गुन्ह्यातील आरोपी यशोदानगर भाजी मार्केट येथे उभा आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सापळा लावुन आरोपीस मुद्देमालासह अटक केली आहे.पुढील तपास स.फौ / ए.पी. आढाव हे करीत आहे .

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक अहमदनगर मनोज पाटील , अपर पोलीस अधिक्षक अहमदनगर सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अहमदनगर , अनिल कातकाडे,पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी , यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय जपे ,पोलीस नाईक विनाश वाकचौरे , पोलीस नाईक वसीम पठाण , पोलीस नाईक शैलेश गोमसाळे ,पोलीस नाईक भास्कर गायकवाड पोलीस नाईक हमद इनामदार , पोलीस कॉन्स्टेबल धिरज खंडागळे , पोलीस कॉन्स्टेबल शिरीष तरटे ,पोलीस कॉन्स्टेबल सचिन जगताप , पोलीस कॉन्स्टेबल चेतन मोहिते , यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here