वाहनाच्या धडकेने हरणाचा मृत्यू ;
राशिन- खेड मार्गावर करपडी फाट्यानजीक दुचाकीच्या धडकेने हरणाचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. सामाजिक कार्यकर्ते रामदास सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली.
पुणे वन्यजीव विभागाच्या अंतर्गत कर्जत तालुक्यातील मोठे वनक्षेत्र आहे. मात्र अनेक वनक्षेत्रात मानवी हस्तक्षेप वाढल्याने वन्यप्राणी सैरभैर होताना दिसत आहे. अनेक प्राणी जिवाला मुकत आहेत.