संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले.
गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, देशावर शोककळा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून आदरांजलीजगभरातील कोट्यवधी लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
पहिल्यांदा गाण्यातून लतादीदींनी कमावले होतो अवघे 25 रुपये!
लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली. सोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला होता.
जवळपास गेल्या 30 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते.
मुंबई : गेल्या आठ दशकांहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘स्वर्गीय सुरांनी’ विराम घेतला. 
भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांची प्राणज्योत मालवल्याची अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. वयाच्या 93 व्या वर्षी लतादीदींनी जगाचा निरोप घेतला.
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर जवळपास महिनाभर त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. मात्र लतादीदींची तब्येत काल (शनिवारी) अचानक बिघडली.
श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं.
लतादीदी उपचाराला प्रतिसादही देत होत्या, मात्र रविवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 
फक्त देशच नाही, तर जगभरातील चाहत्यांना या बातमीने सुन्न केले आहे.मुंबईतील पेडर रोड भागातील लता मंगेशकर यांच्या प्रभुकुंज निवासस्थानी दुपारी 12.30 वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.
त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता शिवाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.महिनाभरापासून उपचारलता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली.
सोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. जवळपास गेल्या 30 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते.
त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. शनिवारी लतादीदींची प्रकृती पुन्हा बिघडली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले. त्याआधी लता मंगेशकर यांच्या भगिनी आणि प्रख्यात गायिका आशा भोसले, बंधू आणि सुप्रसिद्ध गायक-संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी शनिवारी रात्री भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 
तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि श्रद्धा कपूर, पियुष गोयल यांनीही रुग्णालयात भेट दिली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून शोकदेश की शान और संगीत जगत की शिरमोर स्वर कोकिला भारत रत्न लता मंगेशकर जी का निधन बहुत ही दुखद है। पुण्यात्मा को मेरी भावभीनी श्रद्धांजलि। उनका जाना देश के लिए अपूरणीय क्षति है। वे सभी संगीत साधकों के लिए सदैव प्रेरणा थी।






