अहमदनगर – शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा व तालुका कार्यकारणीची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया संदर्भात बैठक जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांचे मागदर्शनाखाली पार पडली.यावेळी जिल्हा महासचिव योगेश साठे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष गलांडे,चंद्रकांत नेटके, पारधे सर,सुरेश खंडागळे, चंद्रकांत डोलारे,युवा जिल्हाध्यक्ष संतोष जठार,शहर अध्यक्ष संजय जगताप,संतोष जौंजाळ,सोमनाथ भैलुमे, अतिश पारवे,प्यारेलाल शेख, मारुती पाटोळे,रविकिरण जाधव,विनोद गायकवाड,भाऊ साळवे,अमर निरभवणे, अजिमराजे शेख,देवा खरात,संजय शेलार आदीसह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका या समविचारी पक्षसंघटना यांना सोबत घेऊन लढणार आहे, छत्रपती शिवाजी महाराज, फुले,शाहू,आंबेडकर विचारांन मानणारा एक मोठा वर्ग वंचित बहुजन आघाडी सोबत आहे असे दिसून आले.सत्ताधारी पक्षातील नाराज गट मोठ्याप्रमाणात आहे ते सर्व वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात आहे.गट गण वार माहिती घेऊन व नवीन गट रचना बाबत सखोल चर्चा तालुकाध्यक्ष यांचे सोबत करण्यात आली.
यावेळी गट गण प्रमुख नेमणूक करण्यात आली,बूथ बांधणी करण्याची जबाबदारी ही गट गण प्रमुखांची असेल त्यासाठी त्यांना मार्गदर्शन योगेश साठे यांनी केले.जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन तालुकाध्यक्ष यांचे कडे इच्छुक उमेदवार यांची प्राथमिक चाचपणी करण्यात आली आहे.राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचे अकोला पॅटर्न जिल्ह्यात राबवायचे आहे.जिल्ह्यात पक्षाला आलेली मरगळ व पक्षाची प्रतिमा उंचवायची असेल तर प्रत्येक कार्यकर्त्याने स्वयंप्रेरणेने उत्स्फूर्तपणे या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानाचा टक्का आपल्याला लोकसभा विधानसभा पेक्षा कश्या पद्धतीने वाढवता येईल याचा विचार करावा.
प्रस्थापित पक्षाचे सत्ताधारी नेते कार्यकर्ते मतदारांपर्यंत नवनवीन संकल्पना घेऊन मतदारांना आकर्षित करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आणि इथल्या शोषित पीडित वंचित बहुजन घटकांना एकत्र करून आपल्याला ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जिंकण्यासाठी आपल्या सोशल मीडिया सह सर्व प्रसिद्ध माध्यमांद्वारे जनतेपर्यंत आपल्या पक्षाचे ध्येय धोरण पोहचवा लागणार आहेत.भविष्यात ओबीसी, भटक्या विमुक्त जमाती ना फक्त मतदानाचा हक्क असेल परंतु निवडणुका लढविता येणार नाही असे एकंदरीत इथल्या सत्ताधारी पक्षांची भूमिका उघड उघड दिसून येत आहे.
त्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलने करण्यात आली आहेत.त्याचबरोबर मुस्लिम समाजासाठी महमंद पैगंबर बील आद.बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शनाखाली तयार करून विधानसभेत मांडण्यात आले.पक्षात काम करताना आपल्या पदापेक्षा आपले काम मोठे दिसले पाहिजे असेही संतोष गलांडे यांनी सांगितले आहे.बैठकीचे औचित्य साधत जिल्हा सचिव पदी आबासाहेब रामफले आणि जिल्हा संघटक पदी रवींद्र निळ यांची जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांनी सर्वानुमते निवड करण्यात आली.जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक समन्वय समिती मध्ये जीवन पारधे आणि संतोष गलांडे यांची निवड करण्यात आली.










