अहमदनगर – जिल्ह्यात 804 नविन कोरोनाबाधित रुग्णांची आज नोंद झाली आहे. 02 फेब्रुवारी रोजी हीच संख्या जिल्ह्यात 1 हजार 05 इतकी होती .
आज नोंद झालेल्या 804 नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अहमदनगर शहर 228, श्रीगोंदा 25 ,राहाता 79 ,श्रीरामपूर 69 ,शेवगाव 25, नगर ग्रामीण 61 ,नेवासा 51, पाथर्डी 56, कोपरगाव 17, इतर जिल्ह्यातील 30, कर्जत 10 ,अकोले 36, राहुरी 25, जामखेड 15, मिलिटरी हॉस्पिटल 09,संगमनेर 06, पारनेर 53 , इतर राज्यातील 03 आणि भिंगार कँटोन्मेंट मधील 06 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
आज जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत 125, खाजगी लॅबमध्ये 457 आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 222 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.