चांदबीबी महालवर चोरी करणाऱ्या आरोपीस अटक, मुद्देमाल जप्त

352

अहमदनगर – अहमदनगर शहरातील ऐतिहासिक ठिकाण असलेल्या चांदबीबी महालावर चाकू आणि दगडाच्या धाक दाखवून तब्बल तीस हजार रुपयांचा मुद्देमाल सोडणाऱ्या आरोपी भारत मच्छिंद्र माळी याला तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी काल रात्री उशिरा अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रवीण गोविंदराव हे चांदबिबी महालाजवळ फिरायला गेले असता त्यांच्याकडील वीस हजार किमतीची मोटरसायकल ,मोबाईल आणि एक हजार तीनशे रुपयांची रोख रक्कम व ज्वेलरी चे मंगळसूत्र असा एकूण 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल दांपत्यांना चाकूचा व दगडाचा धाक दाखवून चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

या गुन्ह्याचा तपास करत असताना भरत मचिंद्र माळी यास अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील गेलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.आरोपी भरत माळी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून अहमदनगर व बीड जिल्ह्यात त्याचेवर मालाविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे अशी माहिती नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here