Anil Deshmukh : राज्यातील पोलीस बदल्यांवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पोलीस बदल्यांची यादी अनिल परबच आपल्याकडे द्यायचे असा अनिल देशमुखांचा जबाब ईडीच्या चार्जशीटमध्ये नोंदविण्यात आला आहे. मला कुठल्याही व्यक्तीनं यादी दिलेली नव्हती, तर अनिल परब यांनी यादी दिली होती. तिच यादी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली होती असं अनिल देशमुख यांनी जबाबात नमूद केलं आहे.
याचबरोबर अनिल देशमुखांनी आणखी एक धक्कादायक माहिती दिली आहे. कदाचित अनिल परब यांना शिवसेनेच्या आमदारांकडून ही यादी मिळायचे आणि माझ्याकडे द्यायचे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय. देशमुख यांच्या या नव्या आरोपामुळं अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनिल देशमुख म्हणाले, अनिल परब यांनी दिलेली यादीच अतिरिक्त मुख्य सचिवांनी दिली होती. त्यानेळी मी सांगितले होते की, जर बदल्या नियमात बसत असेल तर ही प्रक्रिया करा अन्यथा प्रक्रिया नाही करू नका.
मुंबई पोलीस दलात बदल्यांसाठी असलेल्या समितीच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त असतात. या समितीमध्ये पीएसआय ते डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेतला जातो. मुंबई पोलिसांतर्गत बदल्यांची यादीही गृहमंत्रालयात तयार करण्यात आली होती. ही यादी मला स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेकदा दिली होती. त्यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे किंवा त्यांचे ओएसडी रवी व्हटकर यांनीही अनेकदा दिली होती. बदल्यांची ही यादी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून दिली जात होती अशी माहिती परमबीर सिंह यांनी दिली. या यादीची कोणतीही नोंद नसल्याचेही त्यांनी म्हटले.
वाझे प्रकरणावर अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परब म्हणाले, याबाबात कुठलीही माहिती आमच्याकडे नाहीत हे नेमकं प्रकरण तपासून बघावं लागेल.






