भंडारा – बारावीच्या वर्गात शिकणार्या एका विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील परसोडी नाग घडली आहे. ही धक्कादायक घटना काल रात्री उशिरा उघडकीस आली आहे.धीरज रमेश कसार असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार लाखांदूर तालुक्यातील परसोडी नाग धीरज कसारं हा काल मंगळवार दीं.1 फेब्रुवारी रोजी आपल्या महाविद्यालयात गेला होता. त्यांनतर तो घरी आला तेव्हा घरीकुणीही नव्हते, त्याची आई शेतीकामासाठी तर वडील जनावरे चारण्यासाठी गेले होते. घरी कुणीही नसल्याचे बघून धीरज ने आपल्या घरातील स्वयंपाक घरात स्वताला गळफास लावून आत्महत्या केली.
मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. घटनेची माहिती लाखांदूर पोलीसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचून घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. रमेश कसार यांचा एकुलता एक मुलगा असलेला धिरजच्या आत्महत्येचे गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.










