अन् चक्क रोहित शर्माने दिली मराठीत शिवी..!

370

मुंबई – भारतीय संघाचा नवीन एकदिवसीय कर्णधार रोहीत शर्मा वेस्टइंडिजविरुद्ध होणाऱ्या आगामी एकदिवसीय आणि टी ट्वेंटी मालिकेसाठी अहमदाबादमध्ये दाखल झाला असून सध्या क्वारंटाइनमध्ये वेळ घालवत आहे.

क्वारंटाइनमध्ये वेळ घालत असताना तो सोशल मीडियावर वेळ घालत असून यातच मुंबईचा खेळाडू धवल कुलकर्णी याने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की आमची कशावर चर्चा करतोय? तुम्ही कोणी सांगाल का? त्याच्या या पोस्टवर कमेंट करताना रोहित शर्माने एक कमेंट केली आहे.

धवल कुलकर्णीच्या या फोटोमध्ये तिघे मित्र आपापसात काही संवाद साधत आहेत. धवलच्या प्रश्नाला उत्तर देताना रोहित म्हणतो कि सबसे बड़ा zav**** कौन है?” रोहितने मराठी शिवी दिली असल्याचे कळते, पण त्याने तो शब्द पूर्ण लिहिलेला नाही. रोहितच्या या कमेंटवर चाहत्यांनीही मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

रोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी सुरुवातीपासूनच मुंबई संघासाठी एकत्र खेळत आहेत आणि दोघांनी टीम इंडियासाठी सामनेही खेळले आहेत. धवल कुलकर्णी गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here