AIMIM चे राष्ट्रीय प्रवक्ता वारिस पठाण यांच्या चेहऱ्यावर फेकली शाई, पोलिसांकडून आरोपीला अटक

466

Indore News: इंदोरच्या खजराना येथील दर्ग्याला भेट देण्यासाठी आलेले एमआयएमचे (AIMIM) राष्ट्रीय प्रवक्ता वारिस पठाण (Waris Pathan) यांच्या चेहऱ्यावर एका अज्ञात व्यक्तीने शाई फेकली आहे. घटनेनंतर संबधित व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला खरा पण पोलिसांनी त्याला त्वरीत अटक केली आहे. एमआयएम (AIMIM) चे राष्ट्रीय प्रवक्ता वारिस पठाण यावेळी खजराना येथे आपल्या पक्षाच्या समर्थकांसोबत पोहोचले होते. त्यांनी दर्ग्यावर चादर चढवल्यानंतर ही घटना घडली.

वारिस पठाण यांनी आपल्या समर्थकांसोबत दर्ग्यात चादर चढवल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने वारिस पठाण यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. तेथील लोकांना काही समजेल तोवर त्या व्यक्तीने तेथून पळण्याचा प्रयत्न केला. पण काही वेळातच खजराना पोलिसांनी (Khajrana Police) आरोपीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबधित युवक खजरानाच्या पटेल कॉलनीचा रहिवाशी असून त्याचं नाव सद्दाम अजीज पटेल असं आहे. तो 30 वर्षांचा असल्याचंही समोर आलं आहे. तसंच तो मजदूरीचं काम करतो. त्याने ‘प्राथमिक चौकशीत मला वारिस पठाण आवडत नसून तो देशविरोधी वक्तव्य करत असून मुस्लीम समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो’ असं सांगितलं. सध्या पोलिसांनी त्याला अटक केलं असून त्याची चौकशी सुरु आहे. तसंच तो कोणत्या पार्टीशी संबधित आहे का? हे ही पाहिले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here