अहमदनगर – ३० जानेवारी रोजी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली कि एक इसम हा गावठी कट्टा व जिवंत काडतसे विक्री करण्यासाठी (कृषी उत्पन्न बाजार समिती घोडेगांव,ता . नेवासा) येथे येणार आहे .
आता लागलीच गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी नेवासा परिसरात फरार व स्टॅण्डींग वॉरंट असलेल्या आरोपींचा शोध घेत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले .
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बातमीचे ठिकाणी जावून सापळा लावला त्यानंतर काही वेळातच एक इसम कृषी उत्पन्न बाजार समिती गेट समोर येवून सदर ठिकाणी थांबून संशईत नजरेने इकडे तिकडे पाहू लागला . त्यावेळी पोलीस पथकाची खात्री झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेतला. सचिन वसंतराव कोळेकर असे आरोपीचे नाव आहे.
त्याच्याकडून एक गावठी बनावटी कट्टा व दोन जिवंत काडतूसे असे एकूण २६ हजार रु . किं . गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसे मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले .
एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसे विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने ज्ञानेश्वर नामदेव शिंदे स्थानिक गुन्हे शाखा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही सोनई पोलीस स्टेशन करीत आहेत .












