अहमदनगर – एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आरोपी नामे संदीप दिलीप कदम (वय २८ , रा . डोंगरगण , ता . नगर) याने फिर्यादीची मुलगी घरी येत असतांना तिला रस्त्यात आडवुन , हात धरुन तु माझे बरोबर चल , गाडीवर बस असे म्हणुन लज्जा उत्पन्न होईल असे कृत करुन,विनयभंग केला .सदर घटनेबाबत फिर्यादीने एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता .
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना स्वतंत्र पथक नेमण आरोपींचा शोध घेणे बाबत आदेश दिले होते . नमुद आदेशान्वये अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी व पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन अटक करणे बाबत सुचना दिल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे , पोहेकॉ बबन मखेर ,पोहेकॉ मनोज गोसावी ,पोना सुरेश माळी ,पोना विशाल दळवी ,पोना संतोष लोढे ,पोना शंकर चौधरी ,पोना देवेंद्र शेलार , पोकॉ शिवाजी ढाकणे व चापोहेकॉ बबन बेरड अशांनी मिळुन आरोपींचा शोध घेत असतांना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की आरोपी संदीप कदम हा गेवराई , जिल्हा बीड येथे आहे.
खात्रीशिर माहिती मिळाल्याने पथकातील अंमलदार बातमीतील नमुद ठिकाणी जावुन आरोपीचे ठिकाणा बाबत माहिती घेवुन आरोपीस शिताफीने ताब्यात घेवून त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला . त्यास अधिक विश्वासात घेवून कसुन चौकशी केली असता त्याने नमुद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवुन एमआयडीसी पोस्टे येथे हजर केले आहे . पुढील कारवाई एमआयडीसी पोस्टे करीत आहे .
सदरची कारवाई अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील , अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल , उपविभागीय पोलीस अधिकारी , नगर ग्रामिण विभाग पाटील अहमदनगर , यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे , पोहेकॉ बबन मखेर ,पोहेकॉ मनोज गोसावी ,पोना सुरेश माळी ,पोना विशाल दळवी ,पोना संतोष लोढे ,पोना शंकर चौधरी ,पोना देवेंद्र शेलार , पोकॉ शिवाजी ढाकणे व चापोहेकॉ बबन बेरड अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे .