रेशन धारकांना रेशन मिळाले नाही तर …, समाजवादी पक्षाने दिला इशारा

748

अहमदनगर – रेशनकार्ड वरून काही नागरिकांना अजूनही रेशन मिळत नाही त्यांना त्वरित रेशन सुरू करावे आणि निराधार नागरिकांनच मानधन त्यांना देण्यात यावं या मागणी साठी अन्नपुरवठा यांच्या दालनासमोर दक्षिण जिल्हा अध्यक्ष अजीम राजे यांच्या नेतृत्व खाली महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या दालनासमोर आंदोलन करून निवेदन देण्यात आले.

शहरातील अनेक भागात नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून रेशन कार्ड वर धान्य देण्यात येत नाही गोरगरीब महिला रेशन धान्यासाठी चक्रा मारून दुकानदार कडून अरेरावीची भाषा वापरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करण्यात येत आहे.

शासन मार्फत मिळणाऱ्या मोफत राशनही दिले जात नाही मागणी केली तर फॉर्म भरून दया अशे अनेक फॉर्म भरून जमा केले असुन देखिल धान्य मिळत नाही. रेशन दुकानदार हे काळ्या बाजाराने रेशन धान्य विकतात जिल्हा पुरवठा प्रशासन यांना पाठीशी घालत आहे असे दिसून येते नागरिकांची होणारी गैर सोय कधी थांबवणार गरजु लोक आपल्या हक्काचे राशन घेतात परंतु तेही त्यांना मिळत नसून मग काय आता भिक मांगायची काय असे आरोप महिलांनी केले.

त्यावेळी उपस्थित दक्षिण महिला जिल्हा अध्यक्ष मदिना पठान, महिला शहर अध्यक्ष विद्या जाधव, मुमताज शेख, रेश्मा शेख, दक्षिण जिल्हा प्रमुख महासचिव फिरोज पठान, जिल्हा महासचिव जहीर सय्यद, शहर अध्यक्ष शाहाबाज बॉक्सर, मनीषा बोराटे, संगीता नवगिरे, सुरेखा उमाप, संगीता कुऱ्हाडे, आशा सोनवणे, तबसुम जरीना आदि महिला पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच राशन घेण्यासाठी फॉर्म भरणे आवश्यक केल्याने अन्नपुरवठा कार्यालय मध्ये येत नाही ते फॉर्म झेरॉक्स दुकानातून घ्या असे सांगण्यात येते व पराग बिल्डिंग येथील पुरवठा कार्यालयातील महिला अधिकारी सर्वांशी अरेरावी ची भाषा करून गोरगरीब महिलांना उडवाउडवीची उत्तरे देतात त्यामुळे येत्या 8 दिवसात राशन दुकानदारची चौकशी करुण कायदेशीर कार्यवाही करा व रेशन धारकांना रेशन मिळाले नाही तर महिला समाजवादी पार्टीच्या वतीने सर्व महिला सामूहिक आत्मदहन करणार असून महसूल मंत्री यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here