मुंबई – एकीकडे राज्यात थंडीची लाट सूरु असताना पुन्हा एकदा हवामान विभागाकडून अवकाळी अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
राज्यातील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात 3 फेब्रुवारी पासुन अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
तर थंडीचा जोर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कमी होणार आहे. राज्यातल्या धुळ्यात 4.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली गेली. नंदुरबारच्या सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये पारा 10 अंशाच्या खाली आला आहे.
राज्यातील इतर प्रमुख शहरे ज्या गोंदियामध्ये 7.8 अंश सेल्सिअस, नागपूर 7.9 अंश सेल्सिअस, नाशिक 8.4 अंश सेल्सिअस, मालेगाव 8.6 अंश सेल्सिअस, औरंगाबाद 9.2 अंश सेल्सिअस, नांदेड 9.6 अंश सेल्सिअस, अकोला 10.1 अंश सेल्सिअस, परभणी 10.5 अंश सेल्सिअस आणि सोलापूर 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.