मुंबई- तारक मेहता का उलट चश्मा या मालिकेत (Tharak Metha Ka Ootala Chama) मधुन अनेक चाहत्यांच्या मनात घर निर्माण करणारी बबीताजी म्हणजेच मुनमुन दत्ता हिच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मागच्या वर्षी तिने यूट्यूब चैनल वर एक व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये अनुसूचित जातीजमातीबद्दल वादग्रस्त विधान तिने केले होते. त्यामुळे देशातील अनेक राज्यात त्याच्याविरुद्ध वेगवेगळ्या संघटनाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. असाच एक गुन्हा हरियाणामधील हंसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात आता बाबिताचा अटकपूर्व जामीन अर्ज हिसारच्या SC-ST कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने नामंजूर केलाय. यामुळे आता तिच्यावर अटक होण्याची भीती निर्माण झाली आहे.
या प्रकरणांबाबत तिने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून सर्व प्रकरणांची चौकशी हरियाणातील हांसी येथे एकाच ठिकाणी करण्याची मागणी केली होती. याशिवाय सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत आपल्यावर दाखल झालेले सर्व खटले रद्द करण्याची मागणी केली होती.
तिची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानंतर मुनमुन दत्ताने पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेत अटकेला स्थगिती देण्याची मागणी केली होती. परंतु नंतर त्यांच्या वकिलाने उच्च न्यायालयातून याचिका मागे घेतली होती.