विवाहित महिलेवर लष्कराच्या 3 जवानांकडून सामूहिक बलात्कार, आरोपी फरार

541

दिल्ली – दिल्लीमध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेवर नौदल आणि लष्कराच्या 3 जवानांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तिन्ही आरोींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

आरोपींनी पीडित महिलेवर दोन वेळा सामूहिक बलात्कार करून त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिसात दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला तिच्या घराजवळील एका पार्कमध्ये फिरत होती, त्याच दरम्यान तिच्या शेजारी राहणारा एक आरोपी तेथे पोहोचला आणि कुटुंबाला भेटण्याच्या बहाण्यानं घरी येण्यास सांगितले. पीडितेने नकार दिल्यानंतरही आरोपीनं तिला जबरदस्ती केली आणि घरी घेऊन गेला. त्याचा एक मित्र इथे आधीच हजर होता. दोघांनी महिलेवर आलटून-पालटून बलात्कार केला आणि यादरम्यान व्हिडिओही बनवला. दोघांनीही महिलेला धमकी दिली की, याबाबत कोणाला सांगितल्यास हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होईल. यानंतर महिला तिच्या घरी गेली आणि बाहेर जाणे बंद केले.


मात्र दोन महिन्यांनंतर काही कामानिमित्त पीडिता घराबाहेर पडली असता आरोपीने तिला पुन्हा एकदा पकडून मुनिरका येथे नेले आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. येथे त्याने आधी एका घरात नेऊन स्वत: बलात्कार केला आणि त्यानंतर मित्रालाही बोलावलं मित्रानं सुद्धा पुन्हा तिच्यावर बलात्कार केला.

आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच तिन्ही आरोपी तेथून पळून गेले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एक नौदलात तर दोन लष्करात आहेत. पीडितेच्या वकिलाने सांगितले की, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तिघांचाही शोध घेत आहेत. आता आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्याची प्रक्रिया सुरूआहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here