अहमदनगर शहरातून मोटार सायकल चोरून नेणारे गुन्हेगार कोतवाली पोलीसांकडुन जेरबंद

472

अहमदनगर – 24 जानेवारी रोजी फिर्यादी मोमिन तस्दीक मोमिन इद्रीस (वय १९ वर्षे रा. जिल्हा परीषद शाळेजवळ मुकुंदनगर अहमदनगर) यांची होन्डा ड्रिम युगा मोटार सायकल ही शनी चौकात भोला जिम जवळ हॅन्डेल लॉक करुन पार्क केली असता ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली अशी तक्रार कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती.

सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अहमदनगर शहरात मोटार सायकल चोरी करणारे आरोपी हे कायनेटीक चौक येथे येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी गुन्हे शोध प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांना रवाना करुन कायनेटीक चौक येथे सापळा लावला.

येथे बिना क्रमांकाच्या दोन मोटार सायकली वरुन चार इसम मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नाव व पत्ता विचारली असता त्यांनी त्यांचे नाव शुभम बबन भापकर (वय २१ वर्ष रा गुंडेगाव ता नगर जि अ नगर), कृष्णा बाबासाहेब गुंड (वय २५ वर्ष रा मेहेरबाबा वेशी जवळ आरणगांव ता नगर), अभिषेक संतोष खाकाळ (वय २० वर्ष रा संभाजी नगर व्हीआरडीई गेट आरणगांव ता नगर जि अ नगर), जालींदर अर्जुन आमले (वय २१ वर्ष रा आमले मळा आरणगांव ता जि अहमदनगर) असे असल्याचे सांगीतल्याने त्याच्याकडे मोटर सायकल बाबत विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की आम्ही अहमदनगर शहरातून वेगवेगळ्या ठिकाणावरून चार मोटर सायकल चोरी केलेल्या आहेत.

यावरून कोतवाली पोलीस स्टेशन कलम ३७९ प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

या आरोपींना मा.न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना २८ जानेवारी पर्यंत पोलीस कस्टडी मंजुर केली. तसेच सदरचे आरोपी पोलीस कस्टडी मध्ये असताना त्यांना विश्वासत घेवून विचारपुस केली असता सदर आरोपींनी दुर्गा देवी मंदीर, दळमंडई, ता. नगर येथे चोरी केले असले बाबत सांगीतल्याने यांचेकडुन ५५,०००/- रुकिंच्या चार मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास सलीम शेख करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here