ITBP जवानांनी लडाखमध्ये उणे 35 अंश तापमानात साजरा केला प्रजासत्ताक दिन, 15 हजार फूट उंचीवर फडकवला तिरंगा

367

Republic Day 2022 : आज देशभरात 73 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. यानिमित्ताने देशाच्या विविध भागातून भारतीय लष्करातील जवानांचे धाडस दाखवणारे आणि प्रजासत्ताक दिन साजरा करणारे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. दरम्यान, लडाखमधील इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) जवानांनी भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन 15 हजार फूट उंचीवर साजरा केला. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

15 हजार फूट उंचीवर प्रजासत्ताक दिन साजरा आयटीबीपीच्या जवानांनी अनेक ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) जवानांनी भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन लडाखमध्ये उणे 35 अंश सेल्सिअस तापमानात 15 हजार फूट उंचीवर साजरा केला. दुसरीकडे, उत्तराखंडच्या कुमाऊं भागात, ITBP जवानांनी 12 हजार फूट उंचीवर प्रजासत्ताक दिन साजरा केला आणि तिरंगा फडकवला.

जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थाप्रजासत्ताक दिनानिमित्त जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यादरम्यान पोलीस कर्मचारी जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये रस्त्यांवर वाहनांची तपासणी करताना दिसले. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत विविध ठिकाणी सुरक्षा दलाचे जवान तैनात असतात. यादरम्यान सुरक्षा कर्मचारी रस्त्यावरील वाहनांची तपासणी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here