अहमदनगर – सतिष उर्फ बाळासाहेब नारायण तोरटे , (रा . चितळे रोड अहमदनगर) हे त्यांचे मोपेड गाडी वरुन रोडने जात असताना जुने कोर्ट जवळ त्यांचे पाठीमागुन तीन अनोळखी आरोपी हे एका विना क्रं च्या मोपेड गाडीवरुन येवून त्यांनी फिर्यादीला गाडीवरुन खालीपाडुन धारधार हत्याराने दोन्ही हाताचे पंजावर मारुन गंभीर जखमी करुन त्यांचे गळ्यातील अंदाजे १० तोळे वजनाची सोन्याची चैन बळजबरीने तोडुन चोरुन नेली होती.
पो.नि. संपतराव शिंदे , कोतवाली पोलीस स्टेशन , अहमदनगर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हयाचे तपासात निष्पन्न केलेला आरोपी अक्षय भिमा गाडे , (रा . शिवाजी नगर , नगर कल्याण रोड , ता . जि . अहमदनगर) हा दिपाली हॉटेल , नगर कल्याण रोड येथे येणार आहे . अशी बातमी मिळाल्याने पोसई दुर्गे व गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदारांनी दिपाली हॉटेल समोर सापळा लावला असता आरोपी अक्षय भिमा गाडे हा सिलव्हर रंगाची अॅक्सेस गाडी सह मिळुन आल्याने त्याचेकडे चौकशी केली असता सदर मोपेड गाडी ही गुन्हा करते वेळी आम्ही रेखी करण्याकरीता वापरलेली आहे असे सांगीतल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचेकडी सिलव्हर रंगाची अॅक्सेस मोपेड गाडी गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आलेली आहे .
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षकमनोज पाटील , अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे व पोसई सुखदेव दुर्गे , पोना योगेश भिंगारदिवे , पोना गणेश धोत्रे , पोना योगेश कवाष्टे , पोना नितीन शिंदे , पोना सलिम शेख , पोना संतोष गोमसाळे , पोना भारत इंगळे , पोकाँ अभय कदम , पोकाँ दिपक रोहकले , पोकाँ अमोल गाढे , पोकाँ सोमनाथ राउत , पोकाँ अतुल काजळे , यांनी केली आहे.










