अहमदनगर – अहमदनगर शहरात वाढत असलेल्या कोरोनामुळे 26 जानेवारीला कॅम्प पोलीस स्टेशन, भिंगार हद्दीतील भुईकोट किल्ला आणि टँक म्युझीयम बंद राहणार आहे. कोव्हीड- 19 रोगाचा फैलाव रोखण्याकरीता 26 जानेवारी 2022 रोजी भुईकोट किल्ला व टँक म्युझीयम हे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
नागरिकांना पाहण्यासाठी दरवर्षी 26 जानेवारी रोजी भुईकोट किल्ला आणि टँक म्युझीयम प्रशासनाकडून खुले करण्यात येते मात्र यावेळी शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता भुईकोट किल्ला आणि टँक म्युझीयम बंद राहणार आहे. त्यामुळे 26 जानेवारी रोजी याठिकाणी नागरिकांनी येऊ नये असे आवाहान शिशिरकुमार देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक कॅम्प पोलीस स्टेशन, भिंगार यांनी नागरिकांशी केला आहे.
तरी सर्व नागरिकांनी दिनांक 26 जानेवारी रोजी भुईकोट किल्ला व टँक म्युझीयम या ठिकाणी येऊ नये. आपले घरातुनच 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करावा असे सर्व नागरिकांना कॅम्प पोलीस स्टेशन यांचेकडून जाहीर आवाहान करण्यात आला आहे. सध्या शहरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. शहरात दररोज चारशे ते पाचशे दरम्यान कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. तर जिल्ह्यात देखील दररोज हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे.













