✨मागील सहा महिन्यांच्या तुलनेत सोन्याच्या दरात मोठी घसरण
⚡मागील सहा महिन्यांचा विचार केला तर आज सोनं जवळपास 7 हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे.
?♂️मार्च महिन्यानंतर सोन्याच्या किंमतीत झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. या घसरणीसह पहिल्यांदाचं सोनं प्रति तोळा 50 हजारांखाली आलं आहे.
?सध्याचा सोन्याचा दर प्रति तोळा 49 हजार 595 जीएसटी सोडून तर जीएसटी धरून 51 हजार 083 रुपये इतका आहे. 7 ऑगस्टला सोनं प्रतितोळा 56 हजार 200 रुपये इतकं होतं. पण आता हाच दर 49 हजार रुपयांच्या घरात आला आहे.
?तर चांदीचे दर प्रतिकिलोला 58 हजार 583 रुपये झाले आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीत वायदा बाजारातील दर 0.08 टक्क्यांनी म्हणजेच 1.40 डॉलरने घसरून 1 हजार 864. 90 डॉलर प्रति औस झाले आहे.
❗त्याशिवाय सोन्याची जागतिक पातळीवरील किंमत सध्या प्रति औस 1 हजार 861.11 प्रति डॉलर आहे.





