अहमदनगर – घरात घुसून भाजीपाला विक्रेत्यासह कुटुबाला शिवीगाळ, मारहाण करणाऱ्या सहा जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक गिते, सोमनाथ गिते व चार अनोळखी इसम यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पांडुरंग मारूती काळे (वय ४४ रा. श्रेयशनगर, तपोवन रोड, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
शुक्रवारी सायंकाळी अशोक गिते याला फिर्यादी हे तू माझ्या घराकडे का पाहतो असे विचारण्यासाठी गेले असता अशोक याने फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर काही वेळाने अशोक गिते. सोमनाथ गिते व इतर चौघांनी फिर्यादी यांच्या घरात घुसून फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
भांडण सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या फिर्यादीच्या दोन्ही मुलींना आरोपींनी शिवीगाळकेली. आरोपी म्हणाले, तू जर आमच्या नादी लागला तर तुला व तुझ्या मुलींना जीवंत सोडणार नाही, असे म्हणाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सुधीर क्षीरसागर करीत आहे.











