लस घेतलेल्या लोकांमध्ये ‘ही’ ओमायक्रॉनची लक्षणे दिसतात, जाणून घ्या…

420

Covid-19 : भारतातच नव्हे तर जगभरात कोरोनाचे जाळे पसरले आहे. या कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी लस हा एकमेव उपाय आहे असे, तज्ञ सांगतात. लस ही केवळ गंभीर संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करत नाही. तर, रुग्णालयात दाखल होण्याचा आणि संसर्गामुळे मृत्यू होण्याचा धोका देखील कमी करते. आता पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनने देशात दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे, ही लस प्रभावी ठरते का? याबाबत थोडा संभ्रम निर्माण झाला आहे. कारण, लसीकरण केलेल्या लोकांमध्ये ओमायक्रॉनची लक्षणे दिसतात. ती कशी? ते आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

कोविड-19 चा हा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉन लसीपासून प्रतिकारशक्ती कमी करण्यास सक्षम आहे. म्हणजेच, लस दिल्यानंतरही तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. परंतु ही लस ओमायक्रॉनचा धोका कमी करण्यासाठी कार्य करते. ज्यांचे अजूनही लसीकरण झालेले नाही, त्यांना या विषाणूची लागण होण्याचा धोका जास्त वाढतो. त्याच वेळी, लसीकरण झालेल्या लोकांमध्ये या संसर्गाची सौम्य लक्षणे दिसू शकतात.

Omicron हा व्हेरियंट डेल्टा प्रकारापेक्षा कमी हलका आहे. ओमायक्रॉनने संक्रमित रूग्णांमध्ये सर्दीसारखी लक्षणे दिसतात आणि ती लवकरही बरी होते. अशा परिस्थितीत, ज्या लोकांना कोविड-19 चे दोन्ही डोस मिळाले आहेत, त्यांना घसा खवखवणे होऊ शकते. ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये. Omicron लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. घसा खवखवण्यासोबतच थकवा, ताप, अंगदुखी, रात्री घाम येणे, शिंका येणे, नाक वाहणे अशी लक्षणे दिसत असतील तर अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण ही Omicron ची लक्षणे असू शकतात . अशा वेळी वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here