- आपल्या मुलीच्या लग्नातला अनावश्यक खर्च टाळून त्या पैशातून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला घर बांधून देण्याचा संकल्प पुण्यातील एका दाम्पत्याने केलाय. या दाम्पत्याचं हे संकल्प आता पूर्णत्वासही येतंय.
- *नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील लक्ष्मी साखरे यांना घर बांधून दिलं जात आहे. पुण्यातील शंकरराव भोई प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून पुण्यजागर हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पा अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींची शैक्षणिक जबाबदारी घेतली जाते. याच भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मिलिंद भोई यांच्या मुलीचे लग्न ठरले. पण लग्नात अवाजवी खर्च न करता आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला निवारा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार लक्ष्मी साखरे यांना घर बांधून दिले जात आहे. या घराचे बांधकाम अंतीम टप्यात आलं आहे. लक्ष्मी साखरे यांचे शेतकरी पती राजेश साखरे यांनी तीन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. दरम्यान घराचं स्वप्न साकार होत असल्याने साखरे कुटुंबाने आभार व्यक्त केले आहेत.*
- लग्न म्हटलं की, प्रचंड थाटमाट. मोठा मंडप, शेकडो पाहुणेमंडळी. विशेष म्हणजे डॉ. मिलिंद भोई यांच्या मुलीच्या लग्नासाठी तर हे सहज शक्य होतं. पण त्यांनी आपल्या गायत्री मुलीच्या लग्नात तसा आवाजव खर्च न करता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला घर बांधण्यासाठी मदत केली. त्यांच्या या उपक्रमाचं आज राज्यभरात कौतुक केलं जात आहे. त्यांची मुलगी गायत्री हिचं ऋषिकेश गोसावी यांच्यासोबत अत्यंत साध्या पद्धतीत आज विवाह पार पडला. या नवदाम्पत्याच्या हस्ते पुढच्या महिन्यात साखरे कुटुंबाच्या नव्या घराचं गृहप्रवेश होणार आहे. भोई यांनी केलेल्या या मदतीमुळे साखरे कुटुंबातही खूप आनंदाचं वातावरण आहे.
- *अर्धापूर शहरातील कृष्णा नगर परिसरात हे घर बांधण्यात येत आहे. घराचं बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या बांधकामासाठी पूण्यजागर प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत मुळे, गुणवंत विरकर, नागोराव भांगे हे काम करत आहेत. आपल्या अन्नदात्याविषयी कृतज्ञता ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शेतकरी आपल्या अन्नदाता आहे. शेतकरी कुटुंबात अडचणी येतात. हा अडचणीत सापडलेला शेतकरी टोकाचा निर्णय घेतो. ही वेळ कोणत्याही कुटुंबावर येवू नये यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. एका सामाजिक जाणीवेतून हा संकल्प केला. तो पूर्ण होत आहे. विवाह सोहळ्यात आहेर न देता शैक्षणिक साहित्य द्यावे, अशा भावना डॉ मिलिंद भोई यांनी व्यक्त केल्या आहेत.
Home महाराष्ट्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबासाठी बांधलं घरं पुण्यातील शंकरराव भोई प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या चार...