तडीपार सराईत गूंडाला पिस्तूलसह वाकड पोलिसांकडून अटक

    891

    तडीपार सराईत गूंडाला पिस्तूलसह वाकड पोलिसांकडून अटक

    पिंपरी – पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या सराईतला वाकड पोलिसांनी पिस्तूलसह अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 23) सायंकाळी सव्वासहा वाजता पुनावळे येथे केली आहे. साहिल रामदास कुंभार (वय 22, रा. ओम चौक, बिजलीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई के एम पाटील यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी साहिल कुंभार हा चिंचवड पोलिसांच्या रेकोर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला 5 फेब्रुवारी 2020 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. तरी देखील आरोपी शहरात िंफरत होता. वाकड पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याला पुनावळे येथील मंगलधारा सोसायटीच्या समोरील रस्त्यावरून पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल आणि एक काडतूस आढळून आले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here