मुंबई – राज्यातील महत्त्वाचे भागापैकी एक असलेले मराठवाडा ,कोकण पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 22 आणि 23 जानेवारी रोजी राज्यातील बहुतेक भागात गारपीट अवकाळी पाऊस पडणार आहे. मागच्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावा लागला होता . अनेक पिके खराब झाली होती. मात्र पुन्हा आता अवकाळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र कोकणात अवकाळी पावसाची शक्यता आहे. येत्या 22 आणि 23 जानेवारी रोजी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच उद्या आणि परवा गारपीट होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम राहणार आहे. तसेच विदर्भात आणि मराठवाड्यात गारपीट पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबचा तयार झाला आहे. दक्षिण कोकण- गोवा ते दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत हा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.











