- राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी 8 नोव्हेंबरपासून कर्मचारी संपावर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशासनाने आता खासगी चालकांची भरती प्रक्रिया सुरु केली आहे.
- ▪️औरंगाबाद विभागात एजन्सीमार्फत 50 चालकांची भरती प्रक्रिया सुरु सुरू असतून यातील 15 कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले. तसेच 11 सेवानिवृत्त चालकदेखील पुन्हा कामावर रुजू झाले. खासगी एजन्सीमार्फत वाहक-चालकांची भरती प्रक्रिया सुरु झाल्यानंतर संपकरी कर्मचाऱ्यांनी खासगी चालकांच्या प्रशिक्षण आणि फिटनेसवर प्रश्न उपस्थित केला आहे.
- ▪️एसटीच्या नियमाप्रमाणे 48 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर ड्युटी दिली जाते. याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संपकरी कर्मचाऱ्यांनी केला आहे. अजूनही अनेक चालक संपावर कायम आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एजन्सीच्या माध्यमातून चालक घेण्यास एसटी महामंडळाने सुरुवात केली आहे. एसटीच्या विभाग नियंत्रक कार्यालय परिसरात सोमवारी अर्ज घेऊन आलेल्या चालकांची मोठी संख्या पाहण्यास मिळाली.
Home महाराष्ट्र औरंगाबाद विभागात एजन्सीमार्फत 50 चालकांची भरती प्रक्रिया सुरु; यातील 15 कर्मचारी कर्तव्यावर...