नागपूर – राज्यात मागच्या काही दिवसांपासून ऑनलाईन पद्धतीने महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. यातच आता नागपुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
स्नॅप चॅट या सोशल नेटवर्किंग साईटवर बारावीतील एका विद्यार्थिनीने एका तरुणाशी मैत्री केली त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. या ऑनलाईन प्रेमात ती तरुणी एवढी पुढे गेली की त्याने आरोपी तरूणाला स्वतःचे न्यूड व्हिडिओ आणि फोटो देखील पाठवले. मात्र त्यानंतर सुरू झाले ब्लॅकमेलिंगचा खेळ.
या प्रकरणात तक्रारदार युवती १७ वर्षांची आहे. ती मानकापूरमध्ये राहते. रितिक मिश्रा नावाच्या आरोपीसोबत तिची गेल्या वर्षी स्नॅप चॅटवर ओळख झाली होती. दोघांचे ऑनलाइन प्रेम प्रकरण बहरले.
ते सलग एकमेकांच्या संपर्कात राहू संपक लागले. तिने त्याला न्यूड फोटो आणि व्हिडिओ पाठवले. त्यानंतर त्याची मागणी वाढतच गेली. त्यामुळे युवतीने त्याला टाळणे सुरू केले. रितिक ब्लॅकमेलिंगवर उतरला. ते पाहून तिने त्याच्याशी बोलणे बंद केले, त्याला ब्लॉक केले.
मात्र रितिकने तिच्या मोबाइलमधील संपर्कात असलेले सर्व नंबर काढून त्यातील एका जवळच्या व्यक्तीला तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ पाठवले. त्याला फोन करून तिला बोलायला सांग, नाही तर गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिली.
नातेवाइकाने हा व्हिडिओ तिला दाखवून विचारणा केली. तिच्या आई वडिलांनाही हा प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित युवतीने मानकापूर पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार नोंदवली. ठाणेदार वैजयंती मांडवधरे यांनी रितिकविरुद्ध विनयभंगांचा गुन्हा. दाखल केला आहे.