चार दिवसानंतर पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या ४ हजारांच्या आत

494

पुणे: PMC Corona Update: मागील काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाचा (corona in pune) प्रसार वेगाने वाढताना दिसत आहे. पण सोमवारी शहरात प्रतिदिन रुग्णवाढ घटली आहे. आज दिवसभरात ३ हजार ९५९ पॅाझिटिव्ह (corona update pune) रुग्णांची वाढ झाली आहे. यापूर्वी सलग चार दिवस कोरोनाचे पाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले होते. आज दिवसभरात रुग्णांना ३ हजार ६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजचा शहरातील पॉझिटिव्हिटी रेट (positivity rate pune) २५.३२ वर गेला आहे.

आज पुणे शहरात एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये सहा रुग्ण हे पुण्याबाहेरील होते. सध्या २१४ रुग्णांवर ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत. तर २६ रुग्ण इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर आणि २० रुग्ण नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर आहेत. आतापर्यंत पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णांची संख्या ५ लाख ६३ हजार ५० वर गेली आहे.

सध्या शहरात ३५ हजार ७३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत झालेल्या मृत्यूंची संख्या ९ हजार १४७ झाली आहे.

शहरात आजपर्यंतचे ५ लाख १९ हजार २८ डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज शहरात १५ हजार ६३० चाचण्या करण्यात आल्या होत्या त्यामध्ये ३ हजार ९५९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here