- ?राहुरी तालूक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील परिसरावर धुक्यामुळे वातावरणात धुक्याची चादर पसरली आहे.दाट धुक्यामुळे प्रवासी,वाहन चालक ,शेतकरीवर्ग चिंतातुर होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.या धुक्यामुळे कांदा,गहू,मक्का हि पिकांवर माव्याचा प्रादुर्भावामुळे पिके शेतकर्यांच्या हातून जाण्याचे संकट उभे राहिले आहे.रस्त्यांवरून प्रवासी,वाहन चालक यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.पहाटेपासूनच धुक्यात परिसर दिसेनासा झाला.धुक्याबरोबर थंडीही असल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून गुलाबी थंडीचा,दाट धुके आणि दवबिंदू अशा मनमोहक वातावरणाचा शेरी चिखलठाण परिसरातील नागरिकांनी, मुलांनी,आनंदमय वातावरणात खास आनंद अनुभवला.






