- अहमदनगर हात उसनवार घेतलेल्या रक्कमेचे परत फेडी पोटी फिर्यादी शेख इरफान रशिद यांस दिलेला धनादेश वटला नाही म्हणुन दाखल केलेल्या खटल्याचा निकाल नुक्ताच अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. यु. पी. देववर्षी साहेब यांनी देवून आरोपी विष्णु हिरा सारस रा भिंगार यांस १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व नुक्सान भरपाई म्हणुन फिर्यादीला ३ लाख रुपये देण्यांचा आदेश दिला आहे आरोपीने नुक्सान भरपाईची रक्कम न दिल्यास ६ महिण्याचा सश्रम कारावाची शिक्षा दिली आहे. सदर खटल्यात फिर्यादीचे वतीने अॅड. शेख हाफिज एन. जहागीरदार, नोटरी पब्लीक व अॅड. दावर एफ. शेख अहमदनगर यांनी काम पाहिले.
- भिंगार येथील फिर्यादी शेख इरफान रशिद याने सन २०१२ मध्ये त्याचा मित्र आरोपी विष्णु हिरा सारस रा-भिंगार यांस २ लाख रुपये आरोपीची व्हॅन दुरुस्ती करीता हात उसनवार दिले होते फिर्यादीने आरोपी कडे सदर रक्कमेची मागणी केली असता सदर रक्कमेचे परत फेडी पोटी आरोपीने फिर्यादीला दिलेला धनादेश वटला नाही म्हणुन फिर्यादीने आरोपीला वकिला मार्फत नोटीस पाठवुन धनादेशाचे रक्कमेची मागणी केली परंतु आरोपीने मुदतीत धनादेशाची रक्कम दिली नाही म्हणुन फिर्यादी याने अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात आरोपी विरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्टचे कलम १३८ प्रमाणे खटला दाखल केला होता आरोपीने दिलेला धनादेश हा भिशीचे व्यवहाराचे सिक्युरीटी पोटी दिलेला होता सदर धनादेशाचा फिर्यादी गैर वापर करीत आहे आरोपी फिर्यादीची कोणतीही रक्कम देणे लागत नाही असा बचाव आरोपीने घेतला होता परंतु न्यायालयाने आरोपी बचाव अमान्य करुन सदर खटल्याचा निकाल दिनांक १०/१२/२०२१ रोजी देवून व आरोपी ला दोषी धरून १ वर्षांचा सश्रम कारावास ची शिक्षा व ३ लाख रुपये नुक्सान भरपाई आरोपीने फिर्यादीला दयावी आरोपीने नुक्सान भरपाईची रक्कम फिर्यादीला न दिल्यास आरोपीला ६ महिण्याची सश्रम कारवासाची शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्यात फिर्यादीचे वतीने अॅड. शेख हाफिज एन. जहागीरदार, नोटरी पब्लीक व अॅड. दावर एफ. शेख यांनी काम पाहिले.







