‘ओला’च्या ‘एस-1’ इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन बंद, ग्राहकांना धक्का..!

561
  • इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. ही बाब लक्षात घेऊन, ‘ओला’ कंपनीने गेल्या वर्षी 15 ऑगस्टला ‘एस-1’ व ‘एस-1 प्रो’ या दोन इलेक्ट्रिक स्कूटरची घोषणा केली होती.
  • ‘ओला’ने ही दोन्ही माॅडेल लाॅंच करताना, ग्राहकांना भरमसाठ आश्वासने दिली. मात्र, वेळेत ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात ‘ओला’ला अपयश आले. त्यामुळे कंपनीने आपली बेसिक स्कूटर ‘एस-1’चे उत्पादनच बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या स्कूटरसाठी बुकींग करणाऱ्या ग्राहकांना तसे कळविण्यात आले आहे.
  • ग्राहकांची ‘ओला’च्या ‘एस-1 प्रो’ स्कूटरला मागणी आहे. त्यामुळे कंपनीने सध्या या एकाच स्कूटरवर लक्ष दिलेय. ‘एस-1’ची बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना ‘ओला’ने सुरुवातीला ‘एस-1 प्रो’चे हार्डवेअर असणाऱ्या स्कूटर दिल्या. मात्र, आता कंपनीने ‘एस-1’चे उत्पादनच थांबवण्याचा निर्णय घेतलाय.
  • *ग्राहकांना दोन पर्याय*
  • ‘ओला’ने आपल्या ग्राहकांना याबाबत कळविले असून, त्यांना दोन पर्याय दिलेत. ‘एस-1’साठी आणखी 9 ते 11 महिने वाट पाहावी लागेल. ग्राहकांनी आपले बुकिंग ‘एस-1 प्रो’साठी अपग्रेड करावे किंवा बुकिंग रद्दही करता येणार आहे.
  • ‘ओला अ‍ॅप’वर 21 जानेवारीला ‘पेमेंट विंडो’ खुली होणार आहे. त्यात सुरुवातीला 20 हजार रुपये भरणाऱ्या ग्राहकांना पूर्ण पेमेंट करता येईल. ‘एस-1’चे ग्राहक ‘एस-1 प्रो’साठी पैसे देऊ शकतात. त्यानंतर फेब्रुवारीपर्यंत या स्कूटरची डिलिव्हरी केली जाणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here