*१)गोलीगत फेम सुरज चव्हाण चित्रपटात* ‘का रं देवा’ या चित्रपटाच्या माध्यमातून गोलीगत फेम टिकटाँक स्टार सूरज चव्हाण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गोलीगत’ आणि ‘बुक्कीत टेंगुळ’ या त्याच्या प्रसिद्ध डायलॉगचा सुध्दा मोठा चाहता वर्ग आहे.
*२)पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
अध्यक्षपदासाठी आमदार अशोक पवार व दिलीप मोहिते देखील इच्छुक होते.
३)भाजपाने 107 पैकी 21 उमेदवारांचे तिकीट कापले.भाजपने उत्तर प्रदेश निवडणुकीत 20 टक्के उमेदवार बदलले… 21 नवीन उमेदवार दिले. त्यात डॅाक्टर वकील आणि सामाजिक क्षेत्रात काम करणा-या उमेदवारांना संधी दिलीय.
४)श्रद्धा शिंदे हिचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक*
मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबातील श्रद्धा नवनाथ शिंदे (बीड) यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत राज्यात पहिला तर देशात 36वा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे घरी अभ्यास करून पहिल्या प्रयत्नात तिने हे यश मिळवले आहे.