Pune : MPSC तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, PSI च्या शारीरिक चाचणीत केवळ एका गुणामुळे गेली होती संधी

442

पुणे : पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली आहे. अमर मोहिते असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे. अमरने नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. 

अमर मोहिते हा पुण्यातील सदाशिव पेठेत राहत होता. मागील 2 वर्षापासून तो PSI ची तयारी करत होता. शारीरिक क्षमता चाचणीत केवळ एक गुण कमी पडल्याने त्याची संधी हुकली होती, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे. काल मित्रांना भेटला त्यावेळी तो निराश वाटला. त्यातूनच आज त्याने रूमवर आत्महत्या केली. मराठा आरक्षण टिकलं असतं तर त्याची संधी हुकली नसती असं बोललं जात आहे.

“अमर मोहितेने आत्महत्या करताना कोणतीही सुसाईड नोट मागे सोडलेली नाही.  त्याने कौटुंबिक कारणातून आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. अमर मोहितेचा भाऊ भोसरी पोलीस ठाण्यात पीएसआय आहे. त्याने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अमरच्या खोलीचे दार उघडले आणि  हा प्रकार समोर आला अशी माहिती पोलीस निरीक्षक कुंडलीक कायगुडे यांनी दिली आहे. 

दरम्यान, या घटनेनंतर अमरच्या नातेवाईकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. समस्या या कायम असतात. पण, त्यावर उपाय देखील आहेत. त्यामुळे अमरने उचललेल्या या टोकाच्या पावलानंतर आत्महत्या ही कायमच्या समस्येवरचा तात्पुरता उपाय आहे अशीच प्रतिक्रिया सध्या अमरच्या आत्महत्येनंतर प्रत्येक जण देताना दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here