सलमान खानचा शेजाऱ्याविरुद्ध मानहानीचा दावा, कोर्टात खटला सुरु.

*सलमान खानचा शेजाऱ्याविरुद्ध मानहानीचा दावा, कोर्टात खटला सुरु..!*_ बाॅलिवूडचा भाईजान.. अर्थात अभिनेता सलमान खान नि त्याच्या शेजाऱ्यात जोरदार वाद रंगलाय.. सलमानने आपल्या या शेजाऱ्याविरुद्ध थेट न्यायालयात धाव घेतलीय. केतन कक्कड असे या शेजाऱ्याचे नाव आहे. पनवेलमध्ये सलमानचे फार्म हाऊस असून, सण-उत्सव, तसेच विविध कार्यक्रमानिमित्त सलमान आपल्या कुटुंबासोबत तेथे जात असतो.

सलमानच्या फार्म हाऊसलगतच केतन कक्कड याचा मोठा भूखंड व बंगला आहे. नेमका वाद काय..?*

केतन कक्कड याने सोशल मीडियावर सलमान खानचे काही फोटो पोस्ट केल्याने सलमान व त्याच्या कुटुंबीयांना त्याचा त्रास झाला. तसेच एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केतनने आपली बदनामी केल्याचा आरोप सलमानने केला आहे. यू-ट्युब, ट्विटर, फेसबुकवर सलमानविरुद्ध बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यात आला असून, तो काढून टाकावा, अशी मागणी सलमानने केली आहे.

याबाबत सलमानने कक्कड याच्याविरुद्ध सिटी सिव्हील कोर्टात खटला दाखल केला आहे. कोर्टाने कक्कड याला सलमानच्या आरोपांना उत्तर देण्यास सांगितले असता, त्यावर कक्कड याच्या वकिलांनी कोर्टाकडे काही वेळ मागितला. आता या खटल्याची पुढील सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे.➖➖➖➖➖➖➖➖

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here