पतंगोत्सव दरम्यान स्पीकरवर हनुमान चालीसा लावला म्हणून धमकी,तोडफोड.
भिंगार: १४ जानेवारी २०२२
हनुमान चालीसा लावली म्हणून धमकी,तोडफोड मकर संक्रांती निमित्त सुरू असलेल्या पतंगोत्सव दरम्यान स्पीकरवर हनुमान चालीसा लावला या कारणातून स्पीकरची मोडतोड करून धमकी.मकर संक्रांती निमित्त सुरू असलेल्या पतंगोत्सव दरम्यान स्पीकरवर हनुमान चालीसा लावला या कारणातून स्पीकरची मोडतोड करून धमकी देण्यात आल्याची घटना अहमदनगरच्या आलमगीरमधील द्वारकाधीश कॉलनी भागात आज (दि.१४) सायंकाळी घडली. या प्रकरणी पोलिसात सोहेल, शोयब आणि एक अनोळखी अशा तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रभावती मुंढे यांनी भिंगार पोलीसात तक्रार दिली आहे. प्रभावती मुंढे यांची मुले टेरेसवर पतंग उडवत होती. या दरम्यान त्यांनी स्पीकरवर हनुमान चालीसा लावला होता,त्यावरून हा वाद झाला.याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.






