Mumbai Coronavirus Cases : मुंबईतील कोरोना (Corona) रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेत नसून मागील दोन दिवस काहीशी आटोक्यात येणारी रुग्णसंख्या आज पुन्हा वाढली आहे. मागील 24 तासांत आजही 16 हजार 420 नवे कोरोनाबाधित सापडले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारच्या तुलनेत जवळपास 5 हजार अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. या कोरोनारुग्णसंख्येमुळे पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून नागरिकांनाही काळजी घेणं अनिवार्य झालं आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी 14 हजार 649 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 87 टक्क्यांवर कायम राहिला असून मागील 24 तासांत सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 420 झाली आहे.