- औरंगाबाद, दिनांक 11 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 64 जणांना (मनपा 58, ग्रामीण 06) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 448 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 349 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 51 हजार 532 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 658 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1426 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- मनपा (285)
- घाटी परिसर 2, बन्सीलाल नगर 2, सिंधी कॉलनी 1, चेतना नगर 1,कांचनवाडी 1, पैठण रोड 3, औरंगपूरा 1, उस्मानपूरा 1, भावसिंगपूरा 1, पडेगाव 3, ज्योती नगर 1, प्रताप नगर 1, एन-3 येथे 1, राम नगर 1, विमानतळ परिसर 1, कंधारकर हॉस्पीटल परिसर 1, सहेदा कॉलनी 1, नंदनवन कॉलनी 1, गौतम नगर 1, शहानुरवाडी 1, आरेफ कॉलनी 1, सिडको एन-पाच येथे 2, एन- वन येथे 1, हडको एन-बारा येथे 1, अन्य 254
- ग्रामीण (64)
- औरंगाबाद 16, फुलंब्री 5, गंगापूर 14, कन्नड 2, खुलताबाद 2, सिल्लोड 8, वैजापूर 5, पैठण 5, सोयगाव 7
Home महाराष्ट्र औरंगाबाद Aurangabad : जिल्ह्यात एक लक्ष 46 हजार 448 कोरोनामुक्त, 1426 रुग्णांवर उपचार...







