- रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे.
- कशामुळे दरवाढ..?*
- एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करण्यासाठी रेल्वेने आता विमान तिकिटाप्रमाणे ‘युजर चार्ज’ लागू केला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता 10 ते 50 रुपयांपर्यंत ‘यूजर्स चार्ज’ द्यावा लागणार आहे. प्रवासी ज्या श्रेणीच्या डब्यातून प्रवास करतील, त्यानुसार हा ‘युजर चार्ज’ भरावा लागणार आहे.
- आता यापुढे रेल्वेने प्रवास करण्यासाठी खिसा आणखी हलका करावा लागणार आहे. लांबच्या प्रवासासाठी आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत. रेल्वे प्रशासनाने ‘एक्सप्रेस रेल्वे’च्या तिकिट दरात वाढ करण्याच निर्णय घेतला आहे..
- लांबच्या प्रवासासाठी नेहमीच रेल्वेला पसंती दिली जाते. कारण, परवडणारे तिकीट दर नि वेळेत पोहचण्याची हमी असल्यानेच रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते. मात्र, आता त्यासाठी अधिक पैसे लागणार आहेत.
- *कशामुळे दरवाढ..?*
- एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करण्यासाठी रेल्वेने आता विमान तिकिटाप्रमाणे ‘युजर चार्ज’ लागू केला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता 10 ते 50 रुपयांपर्यंत ‘यूजर्स चार्ज’ द्यावा लागणार आहे. प्रवासी ज्या श्रेणीच्या डब्यातून प्रवास करतील, त्यानुसार हा ‘युजर चार्ज’ भरावा लागणार आहे.
- *रेल्वे अपघात वाढले*
- दरम्यान, कोरोनातून सावरल्यानंतर रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे अपघातांत मोठी वाढ झालीय. गेल्या वर्षभरात रुळ ओलांडताना 1 हजार 114 जणांचा मृत्यू झाला. तसेच रेल्वेतून पडून 277 जणांना जीव गमवावा लागला. 2020 च्या तुलनेत गेल्या वर्षी 300 अपघात वाढले आहेत.