आजपासून पुन्हा निर्बंध; नाईट कर्फ्यूसह समारंभांवर बंधनं, काय सुरु, काय बंद- वाचा

446

 मुंबई : राज्यात तिसऱ्या लाटेचा शिरकाव झालाय असं तज्ञांचं मत असून कोरोनाचे आकडे भयंकर पद्धतीनं वाढत आहेत. राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर काल (शनिवारी)  कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात आज मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

रात्री  11 ते सकाळी 5 पर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी  तर रात्री नाईट कर्फ्यू घोषीत करण्यात आला आहे. 

राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.

अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडण्यास निर्बंध

सरकारी कार्यालयात भेटणाऱ्यांना निषेध, आवश्यकता असल्यासच मुख्य कार्यालयाची लेखी परवानगी आवश्यक

प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये वर्क फ्रॉम होम, 50 टक्के पेक्षा अधिक जणांना परवानगी नाही

लग्न समारंभासाठी 50 जणांना परवानगी

अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी

सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी 50 जणांना परवानगी

15 फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद

स्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर बंद

हेअर कटिंगची दुकानं 50 टक्के क्षमतेने सुरू, रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहणार

पर्यटन स्थळं बंद, पार्क, प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे

शॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्पलेक्स 50 टक्के क्षमतेने सुरू

रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार. रात्री 10 ते सकाळी 5 हॉटेल बंद राहणार आहे. होम डिलिव्हरी सुरु राहणार आहे

नाट्यगृह, सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. क्षमता बोर्डावर प्रदर्शित करावी.

नाट्यगृह, सिनेमागृहात संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच परवानगी मात्र रात्री 10 ते सकाळी 8 सिनेमागृहा बंद

  • लग्न समारंभासाठी 50 जणांना परवानगी
  • अंत्यविधी आणि अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी
  • सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी 50 जणांना परवानगी
  • शॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्पलेक्स 50 टक्के क्षमतेने सुरू
  • नाट्यगृह, सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे.
  • रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार.

15 फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद स्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर बंद सर्व पर्यटन स्थळं बंद प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेहॉटेल रात्री 10 ते सकाळी 5 हॉटेल बंद राहणार आहे.सरकारी कार्यालयात भेटणाऱ्यांना निषेध

डोमॅस्टिक फ्लाईट्ससोबतच ट्रेन, रोड-वे ने राज्यात प्रवास करत यायचे असल्यास संपूर्ण लसीकरण किंवा आरटीपीसीआरचा निगेटीव्ह रिपोर्ट  75 तासांपूर्वीचा बंधनकारक आहे. ड्रायव्हर, क्लीनर आणि स्टाफला देखील नियम लागू आहेत. धार्मिक स्थळांबाबत मात्र नियमावलीत कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here