Nashik : लस घ्या नायतर रेशन बंद, भुजबळ काय म्हणाले? वाचा सविस्तर

670

लस घ्या नायतर रेशन बंद करावे लागेल असा इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. राज्यात सध्या ओमिक्रॉन आणि कोरोनाचा कहर वाढल्याने सरकारकडून काही कठोर निर्णय घेण्यात येत आहेत, त्यात सोमवारपासून दहावी बारावी वगळता सर्व शाळा बंद राहणार असल्याची घोषणा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. यावेळी ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पुढच्या आठवड्यात पर्यटन स्थळांबाबत निर्णय घेणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे.

राजकीय पक्षांनी कार्यक्रम रद्द करण्याची गरज आहे, असेही मत यावेळी भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. अनेक ठिकाणी राजकीय कार्यक्रमातील गर्दी पाहता, सर्वांची चिंता वाढली आहे, त्यावरूनच भुजबळ यांंनी नाशिक प्रशासनाला हे आदेश दिले आहेत.

मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मात्र समाधानाची बाब म्हणजे जवळपास 90 टक्के रुग्णांना कोणत्याही स्वरुपांची लक्षणे आढळून आलेली नाहीत. शहरातील सुमारे 93 टक्के कोरोनाबाधित हे इमारतींमध्ये राहणारे आहेत. मुंबईच्या ज्या भागांमध्ये इमारतीचे प्रमाण अधिक आहे, तसेच जिथे उच्च मध्यम वर्गीयांची वस्ती आहे, अशी ठिकाणे हे कोरोनाचे नवे हॉटस्पॉट ठरत असल्याचे काकणी यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here