नाशिकमध्ये बनावट दागिने तारण ठेऊन बँकेला 24 लाखांचा गंडा, चौघांविरोधात गुन्हा दाखल .

नाशिकमध्ये बनावट दागिने तारण ठेऊन बँकेला 24 लाखांचा गंडा, चौघांविरोधात गुन्हा दाखल

नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बनावट दागिने बँकेत गहाण ठेऊन बँकेला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

या प्रकरणात चौघांविरोधात नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बनावट दागिने बँकेत गहाण ठेऊन बँकेला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात चौघांविरोधात नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन कातोरे, संतोष थोरात, निलेश विसपुते, रावसाहेब कातोरे असे या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.

आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या वर्षी आरोपींनी आयसीआसीआय बँकेतून 24 लाखांचे कर्ज घेतले होते. कर्ज घेताना त्यांनी तारण म्हणून सोन्याचे दागीने बँकेकडे ठेवले. मात्र त्यानंतर आरोपींनी बँकेचे हप्ते थकवले.

हफ्ते थकल्याने बँकेने लीलावासाठी सोन्याची तपासणी केली, दागिन्यांची तपासणी केली असता, हे सोने खोटे असल्याचे आढळून आले आहे.

या प्रकरणात नितीन कातोरे, संतोष थोरात, निलेश विसपुते, रावसाहेब कातोरे अशा चार जणांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार जणांवर गुन्हाआरोपींनी बँकेकडे तापण म्हणून ठेवलेले दागिने हे बनावट असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here