पुण्यातील धनकवडी परिसरातील रहिवासी असणाऱ्या एका इंजिनिअर तरुणाने केली आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या.
पुणे, 02 जानेवारी: पुण्यातील धनकवडी परिसरातील रहिवासी असणाऱ्या एका इंजिनिअर तरुणाने आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केली आहे.
आरोपी तरुणाने 76 वर्षीय आईला औषधांचा ओव्हर डोस देऊन तिचा चेहरा प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून निर्घृण हत्या केली आहे. यानंतर आरोपी मुलानं देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा माहिती सहकारनगर पोलिसांना देण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.निर्मला मनोहर फरताडे असं हत्या झालेल्या आईचं नाव आहे.
तर गणेश मनोहर फरताडे असं आत्महत्या केलेल्या आरोपी मुलाचं नाव आहे. मृत गणेश यानं मध्य रात्री आईची हत्या करून आपल्या मावस बहिणीच्या मोबाइलवर मेसेज पाठवून स्वत:ही आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गणेश आपल्या आईसोबत धनकवडी परिसरात वास्तव्याला होता.
तो इंजिनिअर होता पण काही दिवसांपूर्वी त्याची नोकरी गेली होती.तसेच त्याच्या वडिलांचं 5 वर्षांपूर्वी एका आजाराने निधन झालं होतं.
शिवाय त्याच्या आईला देखील अनेक व्याधी होत्या. त्यामुळे आईचा सांभाळ आणि उपचाराचा खर्च त्यालाच करावा लागत होता. अशात नोकरी गेल्याने गणेशच्या डोक्यावर भरपूर कर्ज झालं होतं.
या कर्जाची परतफेड कशी करायची आणि आईच्या उपचारासाठी पैसे कुठून आणायचे याची चिंता त्याला सतावत होती. यातूनच त्याने आत्महत्या करण्याचा विचार केला. पण आपण आत्महत्या केली तर, आईचा सांभाळ कोण करेल? असा प्रश्न त्याला पडला होता.







