प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर गोळीबार

प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर गोळीबार

31 डिसेंबर 2021 :– अहमदनगरमधून गुन्हेगारी वृत्ती जास्त डोके वर काढत असल्याचे चित्र आहे.

आता आणखी एक अहमदनगर मध्ये घटना समोर आली आहे. प्रांताधिकारी कार्यालयासमोर दोन गटांत वाद होऊन गोळीबार झाल्याचे वृत्त आले आहे.

कर्जतच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर दोन गटांत वाद होऊन सदर कृत्य झाल्याचे समजले आहे.

संदीप मांडगे असे आरोपीचे नाव असून याला पोलिसांनी अटक केली आहे. सुदैवाने यात कोणाही जखमी झाले नाही.

अधिक माहिती अशी : भरत नामदेव मांडगे यांनी यासंबंधी फिर्याद दिली आहे. कर्जत तालुक्यातील रेहकुरी येथील कोकनाथ महादेव या नावाने देवस्थानमध्ये सुमारे ७५ एकर क्षेत्र आहे. कर्जत येथील उपविभागीय दंडाधिकारी त्यांच्याकडे या जमिनीच्या वादाबाबत दावा दाखल झालेला आहे.

उप विभागीय दंडाधिकारी कार्यालयासमोर संदिप छगन मांडगे, सचिन छगन मांडगे (दोन्ही रा. रेहकुरी, ता. कर्जत) हे दोघे कामकाजासाठी आले होते.

त्यावेळी दोघांत वाद झाला. संदीप मांडगे याने फिर्यादी भरत मांडगे यांना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाणही केली.दोघांमध्ये ही झटापट सुरू असताना संदीप मांडगे याने कंबरेचे पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला.

यामुळे धावपळ उडाली. सुदैवाने गोळी कोणालाही लागली नाही.गोळीबार केल्यानंतर संदिप मांडगे तेथून निघून गेला, असे भरत मांडगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here